Author Topic: सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे  (Read 1012 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,311
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे
मी जाणून आहे पक्का तुला शहाणे

घेवुनी इथे मी फ्रँक्चर पाय माझा
अशा प्रसंगी का विचार यावा तुझा
टाळता न टळले इस्पितळात जाणे ।

क्रोध येतो मला तुला कसे कळावे
वांछित तुज होतो तेही ना उमजावे
ठरवून सुध्दा भेट झाले न तुझे येणे ।

स्मरता कधी तुला हे दुःख दूर होते
राहूनी मौन स्वतःला सावरले होते
धरावी न अपेक्षा असे मनात येणे ।

© शिवाजी सांगळे 🎭
« Last Edit: June 09, 2017, 01:59:42 AM by शिवाजी सांगळे »