Author Topic: ॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं ?॥  (Read 846 times)

Offline siddheshwar vilas patankar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 283
  • Gender: Male
  • siddheshwar patankar


सिंव्हाने मारायचं

तरसाने पळवायचं

मेहनत करायची दुसऱ्यानेच

भलत्यानेच फळ खायचं

सांग देवा तूच आता

असं कसं नि किती जगायचं

कोंबडीने अंड दिलं तरी

मालकंच त्यावर ताव मारी

येता पाहुणे घरी

कोंबडीच कापून स्वागत करी

अंडपण द्यायचं आणि वेळेसरशी मरायचं

सांग देवा तूच आता , कोंबडीने तरी

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ?

युगेयुगे चालू असाच तुझा गाडा

मरणारे मरतायंत पोटाला खड्डे पडून

जिवंतपणीच आपणसुद्धा असंच बघून मरायचं

हात नाय उचलायचं कि काय नाय बोलायचं

सांग देवा तूच आता , समद्या जगाने तरी

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ?सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C