Author Topic: जत्रा  (Read 336 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,304
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
जत्रा
« on: March 29, 2018, 12:40:57 PM »
जत्रा

अजबच ही आहे, फेसबुकची जत्रा
हौशे, नवशे, गवशे, येती येथे सतरा

कोणाला काय आवडे, कोणा काय
शोधले किती? उत्तर सापडत नाय

बोलावे कुणाला तो, ये तयांना राग
वाटतं सोडून सारे, 'चलो जाये भाग'

खरा खोटा कोण, येथे जरा कळेना
एक दूज्या सांगे, देतो लाईक हो ना

असो कसेही मिळे, व्यक्त होण्या वाव
देती कधी शब्दांस, इथे आपल्या भाव

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
« Last Edit: March 29, 2018, 12:41:10 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता