Author Topic: राजनीती  (Read 247 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 223
राजनीती
« on: March 29, 2018, 05:44:04 PM »
    राजनीती

काय सांगू महती
बाबा, शिक्षण खात्याची
अविचारी फतवे काढी
अन् विचार करून फाडी
नसते संकट उभे करून
तत्पर निवारण करती
संकटमोचन झाले म्हणुनि
आनंदे नाचती
शिक्षण खाते शिक्षण देई
जनास कुंठमती
जीवन जगण्या शिकून घ्यावी
जगण्याची रिती
प्रयोग सतत करीत जावे
निष्कर्षाची ना भिती
चुकले तर माफ म्हणावे
मागे घ्यावी कृती
जनकल्याणाचे श्रेय घेण्या
हीच राजनीती

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता