Author Topic: चिता स्मशानातली  (Read 788 times)

चिता स्मशानातली
« on: May 06, 2018, 12:38:25 AM »
चिता स्मशानातली

असे काही जगायचे की
मरतानाही हसायचे
चुकलो का पत्ता मी?
यमदुताने पुसायचे...

असे मरण मरायचे की
माझ्या राखेलाही गंध यावा...
जळणारी चिता माझी
अन स्मशानाचाही स्वर्ग व्हावा...

                               __ऋषिकेश यादव

Marathi Kavita : मराठी कविता