Author Topic: श्रद्धा अंधश्रद्धा  (Read 771 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,325
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
श्रद्धा अंधश्रद्धा
« on: September 22, 2018, 08:36:55 AM »
श्रद्धा अंधश्रद्धा

माणसा पेक्षा दगड जपले जातात येथे
खरे तर अंधश्रद्धेने पुजले जातात येथे

ठेवती जिवंतपणी उपाशी माय बापास
पंचपक्वान्नं श्राद्धात वाढले जातात येथे

आधुनिक युगात तंत्रज्ञानसिद्ध यंत्राच्या
उदघाटनी नारळ वाढविले जातात येथे

विसरून शास्त्र आधुनिक विज्ञान वाटा
रुढी परंपरा प्रमाण मानले जातात येथे

चाललोय जरी मंगळवारी घेऊनी यान
उतारे धुपारे आजही केले जातात येथे

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता