Author Topic: माननीय मंत्रीसाहेब  (Read 240 times)

Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
माननीय मंत्रीसाहेब
« on: April 17, 2019, 11:39:44 AM »

माननीय मंत्रीसाहेब

माननीय मंत्रीसाहेब
असेच वारंवार येत जा
पदस्पर्श करत जा
आमच्या गावाला
अहो, मतदारांनी मारलाय शिक्का
तुमच्याच नावाला.


निदान त्यानिमित्ताने तरी होतात
एका रात्रीत रस्ते लख्ख
रंगरंगोटी कुंड्या पोस्टर्स
दुसऱ्या दिवशी दिसतात चक्क
डामडौल नि लवाजमा
नेत्र दिपवून करतात थक्क
मग तुम्हाला भेटण्याचा सुद्धा
मतदात्याला नसतो हक्क.

नाक्यानाक्यावर बंदोबस्त
पोलिस दिवसरात्र सज्ज
मग बुवा आमचेच रस्ते
आमच्यासाठी होतात त्याज्य.

अजेंडा तुमचा तुम्हासच ठाऊक
झेंडा मिरवितात कार्यकर्ते
फीत कापून नारळ फोडून
ठोकता भाषण चर्चेपुरते.

ह्या सगळ्यातून वेळ काढून
हालहवाल विचारात जा
किमान हात हालवून का होईना
आम्हाला भेट देत जा
आम्हाला भेट देत जा …
-----------------------------------
कवी: सचिन निकम,पुणे.
कवितासंग्रह: मुरादमन
sachinikam@gmail.com
-----------------------------------

Marathi Kavita : मराठी कविता