फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले,
....ची मी आज सौभाग्यवती झाले
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले.
मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले,
आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले.
संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी