चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.
मोठा मुलगा श्मभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.
मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...च्या जीवावर करते मी मजा