खूप आठवण येते मला.....!!!!!
खूप आठवण येते मला ,
जेव्हा मी उदास असते, तेव्हा तुमच्या सुखद शब्दांची ,
रडावेसे वाटते एकटेपणामध्ये, तेव्हा तुमच्या सोबतीची
माझ्या निर्णयात केलेल्या, तुमच्या त्या योग्य मार्गदर्शनाची
चुकुनही मी , मला मिळालेल्या त्या गोड समजुतीची,
आठवण येते मला
संध्याकाळी न विसरता घेऊन येणाऱ्या त्या खाऊची
सुट्टीच्या दिवशी पार्टनर बनून खेळायच्या त्या क्यारमची,
जिंकलो तर पार्ले बिस्कीट आणि हरलो
तरी पार्ले बिस्कीट देण्याच्या त्या प्रेमळ अटींची
आठवण येते मला
त्या तुमच्या शेवटच्या क्षणाची
सांगत होता जाताना मी जातो, पण मला न समजल्याची
स्वतःलाच कोसते मी, तुमचे बोल नाही समजू शकली,
जाता जाता तुम्हाला दोन थेंब पाणीही नाही पाजू शकली
आठवण येते मला
कमी सहवासात मिळालेल्या, त्या अनंत मायेची
नसूनही जवळ, दु:खात होणाऱ्या त्या हळूवार स्पर्शाची
तुमच्या आठवणीच, आता माझा धीर बनत आहेत
आठवणीना मी आता, माझी ताकद बनवत आहे
आठवण येते मला, त्या वडिलांची
देवाकडे बघताना, त्यांच्या एकटेपणाची
राग येतो देवाचा, पण मी मनाला समजावते
असेल देवही संकटात , तेव्हा बोलावले मदतीला
आणि..आईच्या रुपात एक दूत ठेवला
लेकरांच्या सोबतीला.....
नाही आवरत मला हे अश्रू
तुमच्या आठवणी लिहिताना म्हणून,
क्षमा असावी तुमच्या आठवणी लिहिण्याच्या
इथेच थांबवताना....
निता.......
२०/४/२०१०