तो एक महिना ......!!!!
आठवतो मला तो महिना
जेव्हा बाबांबरोबर तू हॉस्पिटल मध्ये होती ,
घरी आमच्या सोबतीला
फक्त तुमची आठवणच होती ...
आमच्या आणि बाबांच्या काळजीने
तुझाही जीव कासावीस होत होता
त्या महिन्यात तर
दु:खांचा फारच पसारा होता ......
डोळ्यातून येणारा थेंब हि तू
डोळ्या मधेच सुकवत होती ,
आलेल्या संकटाची आमच्यावर
सावलीही पडू देत नव्हती ...
होती संकटे तेव्हा
कोणी नाही विचारले ,
अन्न शिजत आहे का घरात
कोणी डोकून नाही पाहिलं ...
होते थोडे तांदूळ तेच
महिनाभर पुरवले ,
कांद्याचे पाणी करून
तेच तोंडी लावले ...
मागे वळून पाहिलं
तर खूप काही घडून गेले होते ,
ओझ्याने तुझे खादेही
जमिनीकडे झुकले होते ...
तो एक महिना
मला खूप काही शिकून गेला
नात्यांमध्ये असणाऱ्या
ढोंगीपणाची तो जाणीव करून गेला ...
अश्रू कसे प्यायचे
याची शिकवण देऊन गेला
दु:खामध्ये लढण्याची
तो ताकद बनून गेला ...
तो एक महिना मला
जिद्द देऊन गेला ,
शेवटी आपले जीवन आपण जगायचे
हा मंत्र सांगून गेला ...
{....तरी तुला एक सांगावस वाटत ,
बाबां गेले सोडून
आता तू नको जावूस
तुझ्याच पोटी जन्म माझा
अशी शिक्षा नको देऊस ....}
निता....
२८/६/२०१०