Author Topic: तूला अजूनही रहायला हवं होत !!!  (Read 877 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
तुला अजूनही रहायला हवं होत!!!

तुला अजूनही रहायला हवं होत
हे सुंदर जग अजून पहायचे होत
नाजूक कळी होतीस तू
तूला अजून फूलायचे होते
तूझ्या आई वडिलांनी
किती स्वप्न पाहीली होती तुझ्यासाठी
एका कळीला फुलण्यासाठी
तरी तुला रहायला हवं होत
तूझ्या जाण्यानं आता
झाली आहे निराशा
म्रूत्यूने साधलाय डाव
अजून काही काळ तरी
तू रहायला हवं होत
जरी मागितले असतेस
जीवनाचे दान
तर मी दिले असते
आम्ही आता पिकले पान
कधी तरी गळणारच होतो
हे सुंदर जीवन जगण्यासाठी
तरी तुला रहायला हवं होतं
श्री.प्रकाश साळवी
दि.०८-०२-२०१५
(एका कोवळ्या मुलीचे रेल्वे अपघातात निधन झाले ते दृश्य पाहून मन हळहळलं आणि ही ऊत्स्फूर्त कविता सुचली त्या मुलीस ही माझी भावपुर्ण श्रध्दांजली)

Marathi Kavita : मराठी कविता


Amit Samudre

  • Guest
Re: तूला अजूनही रहायला हवं होत !!!
« Reply #1 on: February 24, 2015, 10:44:47 AM »
भावपुर्ण श्रध्दांजली