अद्यात प्रदेशातून दौडत आलेल्या
अशांत वादळान्ना...
धीर गंभीर वाहणार्या,
खूप खोलवर रडणार्या नितळ नदीला,
सरींनी दृष्ट उतरवून टाकल्यावर
विरहाने टचकन ओघळणार्या दवबिंदून्ना....
अव्यक्ताच्या गुजगोष्टी कळतात...
मुकेपणातच ब्रम्हाण्ड मांडून,
करायच्या असतात अव्यक्ताच्या गुजगोष्टी...
हे समजून उमजुनच जन्म घेतात ही सारी,
उत्तरेच्या गर्भातल्या अभिमन्न्युसारखी ...!
... आणि आपल्याला अव्यक्ताच्या गोष्टी कळेतोवर
फार फार उशीर झालेला असतो,
तेव्हा आपले कलेवर शांत निपचित पहूडलेले असते चितेवर
अव्यक्ताच्या गुजगोष्टी ऐकत!!!
-रोहित कुलकर्णी
(दि. २४ मार्च २०१०)