लोकसभेची शोकसभा.............
जनसेवेच्या बुरख्याखाली
उपटसुंभ झाले गोळा
बहुजनांच्या आशेवरती
त्यांनी फिरवला बोळा
दुरवाणीचा फोडून खजीना
कोण झाला कुबेराचा दास
राष्ट्रकुलाच्या नियोजनात
कुणी घेतला पैशाचा वास
घोटाळ्यावर घोटाळे
घोटाळ्यांचे फुटते पेव
एक जरा का थंडावला
दुसर्याला येतो चेव
एकदा का निवडून येता
दारी उगवते पैशाचे झाड
जनताही पण आंधळी
झोप काढते आहे गाढ
तुही खा अन मी खातो
उगाच नको करु ब्रभा
गिधाडांच्या गर्दीत भरली
लोकसभेची शोकसभा
Author Unknown