Author Topic: देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव...!!!  (Read 1734 times)

Offline ankush patil

  • Newbie
  • *
  • Posts: 9
 
देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव...!!!

मी
दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर....भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणूनच शिवाजी कर पण शिवाजी काशीद कर.....!!!

असं देवा तुला जमणारच नसेल तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!!!

             
                ११  जानेवारी   २ ० १ २   
कवी-अंकुश पाटील(निरांकुश)