Author Topic: माझ्या प्रिय ताईसाठी...!!  (Read 1256 times)

माझ्या प्रिय ताईसाठी...!!
« on: August 20, 2013, 11:29:27 AM »
माझ्या प्रिय ताईसाठी...!!

आज पुन्हा आनंदाने,
हसू लागले डोळे माझे,
आले न सांगता न बोलता,
भरुन आले नकळत माझे मन.....

खरच तेव्हा तेव्हा खुप,
रडलो गं मी जिवाच्या आकांताने,
जेव्हा जेव्हा मला आली,
ताई फक्त तुझी आठवण.....

आई नंतर दिलीस माया,
माझा संभाळ ही तुच केला,
दिलेस न विसरता येणारे,
भाऊ-बहीणीच्या नात्यातील अनमोल क्षण.....

आज पुन्हा आठवल्या,
त्या जुन्या आठवणी,
आज पुन्हा आठवले,
आपले ते निरागस बालपण.....

तिथे कुठे असशील,
ताई तिथे सुखी रहा तु,
पण विसरु नकोस आपल्याला जोडणारा,
रक्षबंधनाचा पवित्र सण.....

ताई तु आयुष्यात खुप खुप पुढे जा,
या वेड्या भावाच्या ह्याच शुभेच्छा तुला,
तुझे नि माझे जन्मोजन्माच आहे,
कधीच न विसरता येणार बंधन.....

माझ्या सर्व प्रिय मित्रांना आणि लाडक्या मैत्रिणीँना,
रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २०-०८-२०१३...
सकाळी ११,०३...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: August 20, 2013, 11:36:10 AM by ssonawane100@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: माझ्या प्रिय ताईसाठी...!!
« Reply #1 on: August 20, 2013, 11:47:05 AM »
right message at the appropriate time.I am sure all or sisters also will like this

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: माझ्या प्रिय ताईसाठी...!!
« Reply #2 on: August 20, 2013, 11:52:33 AM »
छोटि बेहेन मधिल एक सुंदर गाणं कालच सह्याद्रिवर पाहिलं व ऎकलं.सर्व भगिनिंनि जरुर ऎकावं