Author Topic: एक अनामिक मी...!!  (Read 1154 times)

एक अनामिक मी...!!
« on: June 01, 2014, 06:59:17 PM »
एक अनामिक मी...!!

ना कुठे ठिकाणा माझा,
हरवलेल्या सुरातला,
बेसुर तराणा मी.....

ना कोणते गाव माझे,
जन्मताच ईच्छा,
संपलेला दिवाना मी.....

ना काही स्वप्न माझी,
चेह-यावर लेप लावून,
हसवणारा नमुना मी.....

ना कोणी आपलं माझं,
मरणाच्या दारात उभा,
जगण्याचा बहाणा मी.....

ना कोणी सखी माझी,
एकटेपणात जळणारा,
वेडा परवाना मी.....

ना कसली आस मजला,
आपल्यांसाठीच शापित,
न स्विकारलेला बेगाना मी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०१/०६/२०१४...
सांयकाळी ०६:४८...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


RAAHUL

  • Guest
Re: एक अनामिक मी...!!
« Reply #1 on: June 15, 2014, 11:35:48 AM »
AS USUAL....SUPERBBB....SUREKH LIHITAY APAN....ASCH LIHIT RAHA...GOD BLESS  YOU....