हिशोब आठवणीचा !!
*****************
काय चुकले कुठे, काही कळेना ,
हिशेब आठवांचा, काही जुळेना ,
आकडेमोड स्वप्नांची, फार केली ,
काय जमा ,काय वजा ऊमजेना ॥
कष्टाने चार भिंतींना ऊभारले ,
माथ्यावर छप्परही सजविले ,
एक निवाराच अजूनही भासे ,
घर होईल कसे ते ऊमजेना ॥
अहंकाराची सावली पसरली ,
सुख संवादाची कडी हरवली ,
चुका शोधण्या जरी तत्पर सारे ,
सौख्य घरपनाचे कुणा कळेना ॥
आप्त,इष्ट,मित्र सारेच साथीला,
जणू सौख्याने हा भरलेला प्याला,
थेंब अमूल्य काही सांडून गेले ,
रिता हा प्याला अजूनही भरेना ॥
आज स्वप्नी पुन्हा बाग बहरली ,
सुगंधी हास्याची ऊधळन झाली ,
हरवलेल्या मधूर आठवणी ,
उदास वाटे सारे आठवतांना ॥
आठवणी त्या पुन्हा आठवतांना ,
जरी झाल्या कितीही वेदना ,
असेच हसू राहील ओठांवर ,
लपऊन डोळ्यातील अश्रूंना ॥
अशोक मु.रोकडे .
मुंबई .