हाय शिवराया बघ काय झाले,
डोळ्यांदेखत गुरु चोरीस गेले.
मध्यरात्रीस घातला चोरांनी घाला,
घात झाला राजे घात झाला.
लहानपणापासून काय शिकलो आम्ही,
शस्त्रकला शिकलात ज्यांकडून तुम्ही,
आज या सार्यांनी उच्छाद केला.
घात झाला राजे घात झाला.
तुझ्याही काळजात झाले असेल दुख,
जिजाऊ हि रडली असेल होऊन मूक,
ईतिहास का कुणी इतुका कच्चा लिहिला.
घात झाला राजे घात झाला.
असो आम्ही तुझी सामान्य रयत,
किंकाळतो संताप हर एक स्वरात,
पण दुभंगतेचा शाप मराठी मनाला.
घात झाला राजे घात झाला.
तूच तेव्हा धीराने चिरला अफझल,
म्हणून कुंकू लावण्याची आमची मजल,
पण साराच स्वाभिमान फुकट विकला.
घात झाला राजे घात झाला.
साहित्य संमेलनस उद्देशून,
साहित्याची संमेलने भरवता कश्याला,
बघा डोळ्यांदेखत ईतिहास बुडाला,
विद्वानही फितूर झाले का या चोरट्याला.
घात झाला राजे घात झाला.
स्वताची लाज वाटून,
माफ कर शिवबा आम्हीच पडलो कमी,
गुरूच्या अंगास शिवले ते नको त्या कामी,
आमचाच साहिश्नुपणा आड आला.
लाज वाटते सांगाया राजे घात झाला, घात झाला.
......अमोल