Author Topic: बघू दे मरण मला बघू दे..!!  (Read 1222 times)

बघू दे मरण मला बघू दे..!!
« on: May 04, 2012, 12:39:11 PM »
बघू दे मरण मला  बघू दे..!!
डोळ्यात त्याच्या माझी जागा
आज  मला ही बघू दे
मुश्कील   हे जगणे इथे मला मरण लवकर दे
कोण नाही कुणाचे येथे
पैस्यांनीच बांधले सारे इथे
पैसेच त्याचे जीवन झाले पैसेच  नाती गोती
पैस्यांसाठी रे खातात माती ..!!
प्रेमही  इथे खेळ जाहला
प्रेमासाठी आपल्यांशीच  भांडला
त्याच  प्रेमाने त्याचा जीव रे घेतला ..!!
खोटे आहेत इथले नाते सारे
मतलबी  आहेत  हे वादळ वारे
झोपड्याही   मोडून जातो
फाटक्यात   हो सोडून जातो
जीवच का सोडून जातो
डोळ्यांना ह्या हो बघवत नाही ..!!
मरणास हि मिठीत घेऊनि
मरणाला हि पाहू दे ..............!!
-
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
© प्रशांत शिंदे..•°*”˜˜”
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
« Last Edit: May 04, 2012, 12:40:57 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता