Author Topic: नजरा!  (Read 789 times)

Offline pralhad.dudhal

 • Jr. Member
 • **
 • Posts: 118
 • Gender: Male
नजरा!
« on: February 08, 2013, 01:33:51 PM »
नजरा!
अशा विखारी इथे,झोंबती  या  नजरा !
 हेरती नारी येता जाता, या नजरा !
 
 बरे वाटे रहाणे,जंगलात श्वापदांच्या,
 शिसारी आणती भुकेल्या या  नजरा !
 
 जाहले कठिण,रस्त्यात चालणे आता,
 पाठलाग करती,लाळगेल्या या नजरा !
 
 जरासे कुठे मुक्त वागणे झाले न झाले,
 भाषा सलगीची ती,बोलल्या या नजरा !
 
 दुनियेत खुले आम, कसे आता घडते सारे ?
 का सज्जनांच्या, न झुकल्या या  नजरा ?
 
प्रल्हाददुधाळ.
 ९४२३०१२०२०.
www.dudhalpralhad.blogspot.com
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नजरा!
« Reply #1 on: February 08, 2013, 04:35:24 PM »
chan lihil aahe... avadal...

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: नजरा!
« Reply #2 on: February 09, 2013, 12:06:51 PM »
वाह! कविता अत्यंत सुंदर. विशेष कौतुक म्हणजे एक पुरुष असून या भावना खूप छान जाणून कवितेच्या रुपात उतरवल्या. सुंदर....अप्रतिम.

Offline pralhad.dudhal

 • Jr. Member
 • **
 • Posts: 118
 • Gender: Male
Re: नजरा!
« Reply #3 on: February 15, 2013, 11:04:08 AM »
Dhanyawad!