Author Topic: असंतोष!  (Read 640 times)

Offline Chinmay K

 • Newbie
 • *
 • Posts: 2
असंतोष!
« on: May 06, 2013, 07:06:18 PM »
चाललेत बघा कसे, रांगेमधुनी माणसांचे
कीड्यापरी चालती, निवांत कुन्थति उम्ब्र्यावारी

घर्र घटक्क घर्र घटक्क, जातं कसं फिरतंय पहा
रक्त तर काळ गळतंय इथे, पांढऱ्या पिठाचा विजयच की हा

इथे नळ उभाय पाण्याला, दमयंतीस जुंपून चाकाला
सत्तेचे तर कायमच आम्हाला थिटे, बसलेत बोबडे-शेंबडे सत्तेला

आमचा कागद बोलतोय कि, आमच्या अश्लील मनाचा आलेख
आमच्याच आया-बहिणींची लाज मिरवतोय आमचाच लेक

माणूस म्हणून ओळख नाही पटणार, दाखव आधी जात-वर्णाचा दाखला
रक्त फिरतंय लाल तरी, धर्माशिवाय तू नुसताच जत्रेचा बकरा

रंग इथे एकाच दिसतो, 'हरा-सौ-के-पत्ती' का
हवालदार तर दर चौकात विकतो, साहेबही खेचतोय दिमतीला

बोटांची आमच्या गम्मत भारी, कशा पटापट दिशा बदलतात
दुसऱ्याकडे वळत नशिबाची, उगाच क्षणात माती करतात

तिच्या काळ्या डोळ्यांचीही आता जादू वाटत नाही
रात्र चढते दारूसाठी, चंद्र पुनवेसहि फिरकत नाही

भ्रष्ट अजून होणार किती, मन आता सडायला लागलय
प्राण निघतोय ओठातून तरी, 'अहो मला त्याचं  काय पडलंय?'

असा अंत होणार नाही, माझ्या उमद्या स्वप्नांचा
शीर तुटून तीट लागो, तुम्हा कलंक पंगु भाड्यांना. 

हात चालेल माझा असा, साक्ष जाणतो सत्याने
आपण मोक्ष माथी नेऊ, कुंचला वा खंजिराने!

by.. Chinmay K
« Last Edit: May 08, 2013, 08:10:15 AM by Chinmay K »

Marathi Kavita : मराठी कविता

असंतोष!
« on: May 06, 2013, 07:06:18 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: असंतोष!
« Reply #1 on: May 07, 2013, 10:13:53 AM »
apratim kavita.... manapasun dad... pan khali tumch nav taka...(jar tumhi lihili asl tar)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: असंतोष!
« Reply #2 on: May 07, 2013, 01:39:47 PM »
रष्ट अजून होणार किती, मन आता सडायला लागलय
प्राण निघतोय ओठातून तरी, 'अहो मला त्याचं  काय पडलंय?'

छान आहे कविता!

Offline Chinmay K

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: असंतोष!
« Reply #3 on: May 08, 2013, 08:13:06 AM »
Dhanyawaad Milindji ani Kedarji..

Ani Kedarji, pahilyandach post keli ahe kavita. pan pudhlyavel pasun nakkich lakshat thevin..
dhanyawaad.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):