Author Topic: मी एक शून्य !  (Read 1076 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
मी एक शून्य !
« on: May 02, 2014, 10:36:30 PM »
मी एक शून्य … !
मी एक शून्य आहे ,
माझ्यामुळे काही आकड्यांना  किंमत  असेलही
पण माझे , हो हो अगदी स्वतःचे मूल्य , किंमत काय ?
मी एक शून्यआहे
वर वर बघता गोल पण आतून 'पोकळ ', रिकामे
काही आकड्यात मी मिसळला तरिहि
काहीच बदल होत नाही , त्या आकड्यातही अन माझ्यातही
मात्र काही आकड्यांना माझ्यातून  वजा केले तर
त्या बिचाऱ्या आकड्यांनाच 'उणेपण' येते
  काही आकड्यांना मी गुणले तरिहि ते नगण्यच गणले जातात
अपवाद फक्त एका क्रियेचा …

कुठल्याही आकड्याला मी भागीतले तर त्यांचे मुल्य 'अनंत ', अमोलत्वाकडे जाते

… त्यामुळे आता फक्त भागाकार करूनच समोरच्या आकड्यांना आनंदाचे भाग भांडवल देणे मला  भाग आहे !

--वैभव वसंत जोशी , पुणे
   
 

 

Marathi Kavita : मराठी कविता