Author Topic: रिचवा दारू ! पचवा दारू  (Read 767 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
रेल्वे म्हणते तुमच्यासाठी
 आम्ही जादा फेऱ्या मारू
 नको काळजी तुम्हां रात्रीची
 ८ फेऱ्या जास्त मारू
 फक्त तुम्ही एवढचं करा
 रिचवा दारू ! पचवा दारू
 
 पवार म्हणती लोकांना अजून
 वाईनची सवय जडली नाही
 घरा घरांत वाईन हवी
 त्यांचे स्वप्न पूर्ण करू
 फक्त तुम्ही एवढचं करा
 रिचवा दारू ! पचवा दारू
 
 सरकारनेही केलीय जय्यत तयारी
 वेळ वाढवलीय बारची भारी
 या संधीचा फायदा घ्या हो
 आपण सरकारचे गल्ले भरू
 फक्त तुम्ही एवढचं करा
 रिचवा दारू ! पचवा दारू
 
 काय जमाना आलाय बघा हा
 जीवास प्यारी झालीय दारू
 किती संसार उघडे पडतात
 जो मरतोय त्याला द्या मरू
 तुम्ही फक्त आनंद लुटा रे
 रिचवा दारू ! पचवा दारू
 
 पुरुषांसाठी आहे व्हिस्की
 स्रियांना बियरचे ग्लास भरू
 सिगारेटचे धुराडे सोडून
 गम्मत जम्मत भारी करू
 दोघांनाही समान हक्क
 रिचवा दारू ! पचवा दारू
 ====================
 संजय एम निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
Re: रिचवा दारू ! पचवा दारू
« Reply #1 on: September 06, 2014, 07:33:04 AM »
क्या बात है संजयजी!
जळो तुमचे संसार
तुटो तुमचा आधार
पण
लाँकर्सना आमच्या
व्हायला हवा भार!
असं सरकरी धोरण आहे आणि सरकार म्हणजे तरी कोण-
लोकशाहीने मान्यता दिलेले `चोर´!


*अनिल सा.राऊत*
9890884228

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):