Author Topic: भरवसा !  (Read 765 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
भरवसा !
« on: August 23, 2014, 11:57:40 AM »
कधी कधी इच्छा नसतानाही उसवाव्या
 लागतात ग काही जखमा आपल्याच
 हाताने कितीही त्रास होत
  असला तरी.............
 काढावी लागते खपली त्याची असह्य
 वेदना सहन करत .......
 मला माहित आहे तुला अजिबात
 आवडत नाही हा माझा स्वभाव
 पण मी अशीच आहे ना
 थोडीशी वेडी.............
 पण उसवते तेव्हाच तर कळते
 ना ग तुला त्याची खोली ?
 आणि खर सांगू तुझ्या भरवशा वरच
 तर करते ना हे धाडस ?
 मला माहित आहे ना की माझ्या
 जखमेची खोली कळली की तू
 नक्कीच शोधशीलच त्यावर
 काही रामबाण उपाय की
  जखमच काय पण जखमेचा
 व्रणही नजरेस पडणार
  नाही पुन्हा असा .........
 
 सौ ज्योत्स्ना राजपूत

Marathi Kavita : मराठी कविता