Author Topic: फक्त एवढच करा..!  (Read 954 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
फक्त एवढच करा..!
« on: September 05, 2014, 11:34:57 AM »

नको मज जगभर नाव,
पोटाला भाकरीचा तुकडा अन्
घोटभर पाणी भाघवण्यास तहान .
नको मज केविलवाणी मदत,
हाताला द्या काम
अन् लावा स्वाभिमानाने जगण्याची आदत .
नको मज ग्यान अन् ते शिक्षण ,
चार-चौघांशी बांधिलकी द्या
कमी होईल बेईमानीचं भक्षण .
नको मज तो धर्म अन् तो देव ,
विषमता सारुन श्रद्देची शिकवण द्या
नाहीतरी त्या दगडाला कधी येईल चेव ?
नको ती सत्ता अन् पैसा ,
समाजसेवेची बीजे पेरा
देश बनेल स्वर्ग जैसा ...
            -S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता


किशोर तळोकार

  • Guest
Re: फक्त एवढच करा..!
« Reply #1 on: September 05, 2014, 11:37:54 PM »
बाबा तुम्ही. . . . प्रेमाचे तुम्ही अम्रुत सागर,
कर्तव्याचा सदा असतो जागर,
आंम्हा घडवण्या अनेक पेलले, संकटाचे अवघड डोंगर,
नात्याचा अर्थ समजवला,
बाबा म्हणतांना वाटतो आदर, तुम्हीच होते तुम्हीच आहात,
आम्हा सर्वांचे आधार,
तुमच्या कर्तुत्वाच्या शिखराची,
आम्हास नाही येणार कधी सर, आयुष्यभर तुमच्या सेवेत बाबा,
सदैव राहू सादर,
सदैव राहू सादर. . . .

. . . . .किशोर तळोकार 9673060762