Author Topic: माणूस इथेच चुकताे...!  (Read 908 times)

Offline kuldeep ugale patil

  • Newbie
  • *
  • Posts: 2
माणूस इथेच चुकताे...!
« on: May 22, 2015, 11:41:18 PM »
     माणुस इथेच चुकताे,
एखाद्याच्या विश्वात एवढा रमणिय
 हाेताे की स्वत:ला विसरून बसताे...

         माणुस इथेच चुकताे,
एखाद्यावर हक्क गाजविण्याच्या प्रयत्नात
स्वत:च आस्तित्व गमावून बसताे...

         माणुस इथेच चुकताे,
एखाद्याचे स्वप्न पूर्ण करता करता ताे
स्वत:चे भवितव्य विसरून जाताे...

         माणुस इथेच चुकताे,
एखाद्याच्या दुख:त एवढा हरवून जाताेकी
स्वत:चा आनंदही विसरून जाताे...

           माणुस इथेच चुकताे,
एखाद्याच्या भविष्याच्या काळजीत
स्वत:च वर्तमान हरवून बसताे...

           माणुस इथेच चुकताे,
एखाद्याला आपलसं करण्याच्या प्रयत्नात
स्वत:चा स्वाभिमानच गमावून बसताे..
एखाद्याच्या आनंदासाठी आपलं सर्वस्वच
अर्पन करताे...खरच माणुस इथेच चुकताे..!!!

© कुलदीप  उगले  पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता