Author Topic: वादळ मनाचे !  (Read 581 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
वादळ मनाचे !
« on: September 19, 2015, 09:29:03 PM »
वादळ मनाचे
हलके हलके वादळ मनाचे
मी शमवित असतो
विखरलेल्या मनाचे अवशेष
मी पुन्हा जमवित असतो
वाहती या भळभळत्या
जखमा मनाच्या
फुंकरीने जखमांना मनाच्या
मी अलगद रमवित असतो
हरवलेत किती शब्द हे
घायाळ मनाचे
एकेक करूनी ते
मी सारे कमवित असतो
पाहिले मी आहे ऊभारलेल्या
या जखमी मनाला
हळू हळू मी या
मनाला गमवित असतो
श्री.प्रकाश साळवी.

Marathi Kavita : मराठी कविता