Author Topic: नेभळटपणा दाखवशील तर .....!  (Read 495 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
नेभळटपणा दाखवशील तर .....!
« on: October 29, 2015, 11:01:20 PM »
नेभळटपणा दाखवशील तर तो निळा झेंडा सोड !
कारण,
येथे मला मर्दाची गरज आहे. मर्दाची !
जो दुश्मनावर विजेसारखा कडाडून क्षणात त्याला भस्म करेल !
गळ टाकून तुझ्या ताटातली भाकर चोरणारे काही नालायक,
तुला भरकवटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
धर्मनिरपेक्ष नावाच तुला शहाणपण शिकवून तुझ्याच ताटातली तो आरक्षण नावाची भाकर चोरतोय.
सावधान !
त्या भाकरीची जरी तुला गरज नसली तरी तुझ्या भावाला त्या भाकरीची अत्यावश्यकता आहे.
म्हणून ती भाकर तुझ्या ताटात असलीच पाहिजे !
तू जर स्वतःला भीमाचा वाघ समजत असशील तर,
त्या भीमाप्रमाणेच तुझ्या जबड्यातून डरकाळी निघायला हवी !
किती दिवस डोळे बंद करून दूध पिनार आणि समाजावर होणारा अन्याय अत्याचार निमुटपणे सहन करणार !
वाघ आहेस तर वाघासारखेच कृत्ये कर !
मांजरा सारखे नाही !
नाही तर ॲट्रॉसिटी कायदाही तुझे दुश्मन व्हिस्की सोबत संपवतील !
म्हणून तुला सांगतो ,
नेभळटपणा दाखवशील तर हा निळा झेंडा सोड !


संजय बनसोडे -9819444028
🙏जय भीम🙏

Marathi Kavita : मराठी कविता