Author Topic: शेवट आहे सुरवातीचा...!  (Read 1443 times)

Offline Satish Choudhari

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
 • Gender: Male
 • Satish Choudhari
  • Mazya Kavita
शेवट आहे सुरवातीचा...!
« on: April 22, 2010, 03:44:56 PM »
विश्वास ह्या मनाचा
एक ध्यास पंढरीचा
निवास ह्या जगाचा
एक श्वास अंतरीचा...

कधी पापण्यांत
दवबिंदु ओलतीचा
भरुन वाहे पाट
कधी थाट जिंदगीचा...

तो हर्ष तो स्पर्श
लवलेश त्या क्षणांचा
नितभर उरलेला
गुलकंद पाकळ्यांचा...

बालपण सुखपण
तारुण्यात वणवण
उतरत्या वयात चढे
चटका मावळत्या उन्हाचा...

एक सत्य नाही असत्य
पण खेळ जीवनाचा
गोल आहे दुनिया सारी
शेवट आहे सुरवातीचा...

-- सतिश चौधरी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: शेवट आहे सुरवातीचा...!
« Reply #1 on: May 12, 2010, 12:37:50 PM »
khupach chan.....