झालं संपलं सारं
का टाहो आता
का पुळका लोकांना दाखवण्यासाठी
कदाचित खंर पाणि आलं असेलही
सगळी तयारी केली असशील
माझं असं काहीच ठेवलं नसशील
चार जणांना विणवित असशील
हातासाठी
हात दुखत असेलही
सोसण्याचं नाटक कर फक्त थोडाच वेळ
एवढं काही दुर नाही
स्मशान
तुझी शाळा त्याच रस्त्याला होती
आठवलं
खुप घाबरायचास मी रोज न्यायची तुला इथुन
आज तु मला नेतोयेस
आज मला भिती वाटतेय
रित सर विधी कर
तुझ्या मनाच्या शांतिसाठी
माझी काळजी करु नकोस
मी शांत झालेय कायमची
आता कसल्या वेदना
कसला चटका
तु मात्र जपुन वाग
काळजी घे जीवाची
उचल माझा अर्ध नग्न देह
ठेव त्या सरणावर
थरथरतोयस कशाला
भिती वाटते जाळण्याची?
वेडा कुठला?
तुलाच करावं लागणार हे
मी माझं कर्तव्य केलं
तुला जन्म देउन
आता तुझी वेळ आहे
परतफेड करण्याची
थोडं थांब, जरा आवाज होऊ दे
मग जा
खात्रीसाठी म्हणतेय
ऊर जळतोय लेका माझा
तुझ्या प्रेमासाठी
मैत्रयामोल!