Author Topic: सावधान!  (Read 963 times)

Offline muktibodh

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • Pradeep S. Muktibodh
सावधान!
« on: July 17, 2012, 10:24:10 PM »
हळु हळु जमु लागलेत काळे ढग,
एक मेकात मिसळत आकार बदलत
वायुवेगाने चाल करत सतत बदलत आपली जागा
सावधान!

आकाशातुन येतील खाली अचानक,
धडधडत, गडगडत, किंचाळत.
चाबकाचे फटकारे उगारत
सावधान!

होईल अचानक हल्ला बेसावध असतांना,
कदाचित रात्रीच्या अंधारात,
उधळुन जाईल तुझा संसार
सावधान!

जपुन ठेव दिव्याची ज्योत
काठी असु दे जवळ,
बायका पोरांना नीट जप
उजाडेल लवकरच!
सावधान सावधान!

प्रदीप मुक्तिबोध

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सावधान!
« Reply #1 on: July 18, 2012, 10:38:55 AM »
hmhmh :-X

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: सावधान!
« Reply #2 on: July 22, 2012, 04:50:23 PM »
:-X same reaction