Author Topic: एक कविता 'तिला' अर्पण ! (दिल्ली बलात्कार प्रकरण)  (Read 1823 times)

Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
निषेध केला मौनानेही
उरी पेटला वणवा
रक्तही म्हणते नसांतले
आता मजला बदल हवा

पाठ फिरवली दैवानेही
नियतीनेही मिटले डोळे
न्याय व्यवस्था आहे दुबळी
कोटही काळे, मनही काळे

कोमल नाजूक पक्षिणीचे
टाकले पंख ज्यांनी छाटून
जाळण्या त्या सैतानांना
नव्या मशाली येतील पेटून

ऐकून वार्ता फुलांच्याही
अंगावरती आले काटे
का वाचवता अपराध्यांना
विषयाला त्या फोडून फाटे

खरोखरी मज पटते आता
न्यायव्यवस्था आंधळी
निमूट बसोनी पाहत असते
निष्पाप जीवांचे बळी 


रात्र समयी प्रकाशणारी 
विझून गेली इवली पणती
तरी घरोघर प्रत्येकाच्या
मनामध्ये ती तेवत होती.......!


‘तिला’ आदरपूर्वक श्रधांजली !

Marathi Kavita : मराठी कविता


deshpande Arpita

  • Guest
खरोखरी मज पटते आता
न्यायव्यवस्था आंधळी
निमूट बसोनी पाहत असते
निष्पाप जीवांचे बळी 
.......TILA AADARPURVAK SHRADHHANJLI

Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
खरच, आज समाजात सुधारणेची नितांत गरज आहे.