आठवते 'ती' सुंदर संध्याकाळ, तो गार वारा..
उसळत्या लाटांनी भिजलेला..तो ओला किनारा...
वारयाच्या स्पर्शाने सुखावून झाडे डोलत होती..
मावळत्या सूर्याची किरणे झेलून प्रसन्न होत होती ..
त्याच संध्याकाळी मी तुला पाहिले त्या किनाऱ्यावर..
स्वप्नातलं घर बांधत होतीस गुळगुळीत वाळूवर..
तुला पाहून मीही स्वप्नांच्या दुनियेत हरवलो..
तुझ्या परवानगी शिवाय तुझ्या स्वप्नांच्या महालात शिरलो..
होतीस तिथली राणी तू..अन् मी राजा झालो..
तुझ्या प्रेमात तेव्हा चिंब-चिंब न्हालो..
तू हसताना तुझ्या गालावरच्या खळीने मला मोहून टाकले..
क्षणभर दुनिया इथेच थांबावी- असे मनापासून वाटले...
जस-जसं तुला बघत गेलो..तुझ्यामध्ये हरवत गेलो..
जणू स्वर्गामधून मी..अमृतरस पिऊन आलो..
अचानक.....अचानक आलो भानावर मी..अन् कळले कि तू परक्याची..
जुळण्याआधीच तुटली नाळ आपल्या नात्याची..
गेलीस तू निघून...मी मात्र एकटाच राहिलो..
त्या दिवशी पावसात..खूप-खूप रडलो..
कळून चुकला मला कि...चूक होती माझीच..
स्वप्ना तुझे पाहिले मी..सत्य कळण्याआधीच......