Author Topic: "मुखवटा...!"  (Read 1217 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"मुखवटा...!"
« on: September 25, 2011, 06:28:25 PM »
(सगळ्यांचंच आयुष्य काही सरळ नसतं... आयुष्यात कितीही वादळं येवोत... पण तरीही शांत राहून समाजात वावर करावाच लागतो... एकूणच काय,,, तर आपल्याला एक मुखवटा घेऊन जीवन जगावं लागतं.... याच मुखावती जीवनाला कंटाळलेली एक व्यक्तिरेखा मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...!)

 :("मुखवटा...!":(

मुखवट्यात थकतोय जीव माझा,
कोंडतोय श्वासोनश्वास तरीही...
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...?:(

धेय्य ते दिसते माझे, दूर त्या क्षितीजांपलीकडे,
जाऊ कसा तिथवरी परंतु, मार्ग सारे वाकडे...
भावनांचा कल्लोळ होतो,
तरीही अजून का शांत मी...?
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...? ॥ :(

श्रावणाच्या त्या सरींनी भिजला हा निसर्ग होता,
ओलेचिंब रान होते, मातीला ओलावा होता...
कोरडे आज झाले ते सारे,
तरीही का ओलाच मी...?
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...? ॥ :(

झाले ते क्षण पसार सारे, देऊन जखमा आणि 'साठवणी',
गाठही सुटली, व्रणही मिटले, मग राहिल्या का आठवणी...?
रात्र,दिवस अन् दिशाही सरल्या,
तरीही हा उभाच मी...?
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...? ॥ :(

नाते आहे मजकडे, किती मित्र अन् किती सखे,
अश्रू होती बोईजड तेव्हा खांदे सारे का पारखे...?
क्षणात हसतो तर क्षणात रडतो मी,
स्वच्छंद विहंग मग का फडफडतो मी...?
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...? ॥ :(

थकलोय तरीही न वाकलोय मी,
या सफरीत बरेच काही शिकलोय मी...
देईल साथ सदा ह्या प्रवासात,
वाट आज ती पाहतोय मी...!
का...? कुणास ठाऊक, पण हा मुखवटाच का जपतोय मी...? ॥ :(
                                                                                         ........महेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता