Author Topic: "जीव कुंठला... कुंठला....!"  (Read 1219 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"जीव कुंठला... कुंठला....!"
« on: September 26, 2011, 12:44:05 PM »
(प्रस्तुत कवितेत एका तरुणाच्या मनातील घुसमट दर्शविली आहे.... आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला एकाकीपणे झुंज देताना त्याच्या मनात निर्माण होणा-या प्रश्नांना मी इथे कवितेत मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे.... संत बहिणाबाईंच्या 'अरे संसारं... संसार' या कवितेच्या चालीत हि कविता मी रचली आहे...!)

 :'("जीव कुंठला... कुंठला....!":'(
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(
घाम गळाया लागला... आसू बनुनी डोळ्यात...
वर रवी तळपतो... खाली मायही तापते,
स्पर्श देयी शांत वारा... वावटळ का दारात...?
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(

बालपण गेलं सारं... चार बूकं शिकण्यात,
हौसेमौजेवर पाणी शानपणाच्या टुकण्यात...
झेप घेया जेव्हा गेलो... तरुणाईच्या गगनात,
चमकले सारे तारे चक्कं लक्खं प्रकाशात...
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(

कुणी तारलंही नाही... कुणी चारलंही नाही,
जिंकता नाही आलं ठाणं... पण हारलंही नाही...
दगडाच्या देवावर थोडा रागं-रागं केला,
नाही कालविली माती... मग डाग का लागिला...?
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(

एका हातानं तोडीलं... एका हातानं जोडीलं,
हात घालूनी छातीत... माझं काळीज काढीलं...
आसवांचा लोचनात... एक बरफसा केला,
किती डोकी मागंपुढं... तरी जीव हा अकेला...
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(

भावनांना शब्दांच्या किवाडातूनं सांडलं,
पापण्यांच्या ओलाईला कवितेतूनं मांडलं...
वाट शोधतो मी आहे... इथे पाउलखुणांत ,
वसवलं होतं गावं... जिथे माझ्याच मनात...!
जीव कुंठला... कुंठला दुनियेच्या बाजारात...! :'(
                                                   .......महेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: "जीव कुंठला... कुंठला....!"
« Reply #1 on: September 26, 2011, 12:56:40 PM »
surekh rachana ....