Author Topic: " गावचे गवत "-आनंद गुंडीले.-जळते निखारे या काव्य संग्रहातून  (Read 690 times)

Offline Anand Gundile

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
  • जळते निखारे या काव्य संग्रहातून
    • http://anandgundile@blogspot.com
जळते निखारे या काव्य संग्रहातून

" गावचे गवत "

 

पूर्वी माझ्या गावात......

नांदायची शांती प्रत्येक घरात

प्रत्येक ओसरीला सुखाचे तोरण असायचे

हिंदू मुस्लीम सर्वांचे एकत्रच

दिवाळी आणि मोहरम असायचे

आंब्याच्या डहाळ्या,पांढरा कापूस,

प्रत्येक प्रहरी सूर्य बदलायचा कूस

हिरवी तूर , मुग ,हिरवाच तो हरभरा

शेतकरी राजा होई हर्षाने बावरा

डोंगर माथ्यावर छोटे देवूळ

तिथेच विठोबा अजून डौलतो आहे

रुक्मिणीशी वारकऱ्यांच्या गोष्टी

कानात अजून बोलतो आहे.....

             पूर्वी माझ्या गावात..........

             हरिणाचीही टोळी यायची

             जमिनीचा तो ओळ सुवास

            वसंतातील बहरही असायचा

            आता हरिनच काय ?

             कुत्राही जवळ येत नाही

             पावसाने कहरच केला

             आता दूरवरही दिसत नाही

             वसंत तर विरूनच गेला

             दुष्काळाने घातलाय घाला

             सुखात राहणारा शेतकरी बाप

            जिवंतपणीच  कोलमडून गेला.......

आता माझ्या गावात.........

आपल्याच ओळखीचा तो पाऊस

काही केल्या दिसत नाही

कर्जाने वाडे ओसाड झाले

पीकही शेतात पिकत नाही

शेतातला अन्नदाता शेतकरी

मातीच्याही कथा सांगत नाही

हिरवे गवत, हिरवी कुरणे

पाण्याविन काहीच उगवत नाही

कर्ज काढून बापाने केली दिवाळी

बियाण्याचेही कर्ज फिटत नाही

            आता माझ्या गावात..........

            प्रत्येक घरी हीच अवस्था

            दुष्काळ रुजू झाला जिथे

            केले आयुष्याचे मातेरे शेतकऱ्याने

           जन्मच संपतोय त्याचा अन्नावीन तिथे

           प्रत्येक शेतकरी बाप आपला

           कर्जाचे व्याज अजून भरतो आहे

           फेडता न आले कर्ज वा  व्याज तेव्हा

           आत्महत्या करून मारतो आहे ....

                                    -आनंद गुंडीले.