Author Topic: "प्रेम...(असेही...?)"  (Read 2464 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"प्रेम...(असेही...?)"
« on: November 20, 2011, 10:55:30 PM »
(संक्षेप: प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या एका तरुणीची आर्त कहाणी थोडक्यात...,)
 :'("प्रेम...(असेही...?)" :'(
ऊर बडवले किती... किती वाहिले मी मोती...
त्याच्यासाठी ह्या डोळ्यांच्या कैक जाळील्या मी वाती...
त्याला ठाव ना मनाची... ना मनाची या भ्रांती...
क्षण विसरले त्याने घालवलेले एकांती...
देत आणाभाका सा-या माझी केली दमयंती...
शिलगावून कूस माझी सुरु जाहली भ्रमंती...
मन भरलं जेव्हा त्याचं दिलं भिरकावून खेळणं...
मग पहिले ना मागे, केली नाही वाछ्यंती...
उघडले डोळे माझे जेव्हा भंगली मन:शांती...
देह होता त्याच्यासाठी माझा पळभरची विश्रांती...
स्थिर झालं जळ माझं खळखळ ना वाहती...
आता ओहोट आयुष्याला कधी येणार ना भरती...! :'(
                                                      .........महेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता