Author Topic: .............तर? (भीती)  (Read 1256 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
.............तर? (भीती)
« on: December 11, 2013, 10:43:57 AM »
स्वल्पविराम नाही पूर्णविराम असेल.............तर?
इतकीच फक्त. गोष्ट पुढे नसेल .............तर?
 
''येईन पुन्हा'' सागून गेलाय तो
कोणास ठाऊक, तो विसरला असेल .............तर?
 
वाढवून ठेवलाय पसारा त्यानी
काय होईल तो चुकला असेल .............तर?
 
निर्मिती तर झालीय निळ्या भांड्यात 
हवं ते घेऊन तो निघून गेला असेल .............तर?
 
पाप पुण्य सांभाळत कुढत जगलो
झालं गेलं गंगेला मिळत असेल .............तर?
 
किती गोड आहेत हे बंध प्रेमाचे.
बंद डोळ्यातलं हे स्वप्न असेल............. तर?
 
 

केदार.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: .............तर? (भीती)
« Reply #1 on: December 11, 2013, 11:37:53 AM »
किती गोड आहेत हे बंध प्रेमाचे.
बंद डोळ्यातलं हे स्वप्न असेल............. तर?

केदार दा,
मस्तच..... :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: .............तर? (भीती)
« Reply #2 on: December 27, 2013, 03:22:47 PM »
                               छान !!!
                                           हे स्वप्नच असले बंद डोळ्यातील जरी
                                           मनातील भाव मात्र जागृत असेल ,,,,,,,,तर !!!