Author Topic: मारवा (गझल)  (Read 994 times)

Offline gajabhauchougule

  • Newbie
  • *
  • Posts: 9
मारवा (गझल)
« on: November 29, 2014, 10:11:38 PM »
"मारवा"  (गझल)
ते कुणाचे गांव होते
स्वप्नात होते राहिले
एक माझे गीत वेडे
डोळ्यांत होते नाहले
  हृदयात ही कुणाची
  वाजते अजुन झांज
  बडवीत ढोल येते
   निळी सावळी सांज
येता रुतू लफंगा
टाकल्या कळ्यांनी माना
पानांच्या आड कोकीळा
का?अजुन घेते ताना
  चांदण्याचे गीत गाता
  सुर होतो चांदवा
  या व्यथांच्या जोगव्याचा
गाऊ कसा मी मारवा


    गजाभाऊ चौगुले
    (पेठ) वडगांव
     ९९७०२०९६३३

Marathi Kavita : मराठी कविता