जीवनात तिने एकच चूकि केली;
वंशाचा दिवा नाही तर पनती म्हणून जन्माला आली...
शेवटी मुलगीच ना ती;
म्हणून आई-बापला नकोशी झ।ली...
दिवसांमागूण दिवस सरले
हळू हळू ती मोठी होउ लागली;
आईचे दूध सोडून
आता पाण्यावरच जगू लागली...
लहानच मात्र विचारी होती
एढयाश्या वयात तिल खूप समज आली होती;
नाजूकसा जिव तिचा
पण किती खस्ता सहन करू लागली...
त्या कोवल्याश्या मनावर केव्हडे दडपण
तरीही सगळे काही विसरून आनंदाने बागड़ू लागली,
एवलेशे हात तिचे
पण घरातलि सगळे कामे करू लागली...
कामाच्या ओझ्याने दमायल व्हायचे
तरीहि हातात पाटी-पुस्तक घेऊन
भविष्याची स्वप्ने रंगऊ लागली...
जाणून होती ती
उंबऱ्याच्या आतच काय ते मुलींचे विश्व,
पण तिला उंबऱ्याच्या बाहेर यायचे होते
स्वतःचे एक नविन जग बनावयाचे होते...
ज्या वाटेने ती निघाली
त्यात अड़थळे तर खूप होते,
पण शिकण्याचीजिद्द होती तीची
धेय्य गाठण्यासाठी अहो रात्र जीजत राहिली...
अखेर मेहनत तिची फळारूपाला आली
आई-बापाला नकोशी पोरगी
अता खूप शिकूण मोठी झ।ली,
अन ह्या पनतिलाही आता दिव्यागत तेज आले...
मुलगा-मूलगी समान हे तीने जगाला दाखउन दिले...
.
.
.
.
..
.(एक सलाम महिलांसाठी नक्की share करा)