Author Topic: मुक्ती (गमन)  (Read 723 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
मुक्ती (गमन)
« on: March 05, 2012, 11:33:57 AM »
दाटून पिंजर्यात बैसल्या
कोण देशच्या राजकन्या
रंग त्यांचा शुभ्र गोरा
डोक्या वरती लाल तुरा

घाबरून बघती तांडव
मृत्त्युचे चालले सभोवार
वाचव म्हणे परमेश्वरा
तूच एक तारणहार

येता वेळ कटण्याची
मांडला आकांत जीवाचा
चमकता सुरी कीरणानी
झाला साक्षात्कार तिला

बंदिवान पिंजर्यात ह्या
जन्म गेला व्यर्थ फुका
ना झाले पत्नी कुणाची
ना झाले कधी माता

अर्थहीन जगणे माझे
का धडपडते जगण्या
सुटण्या  त्रासातून ह्या
मरण हाच मार्ग खरा

देवा तुझी लीला अगाध
कशी ना कळली मजला
आलास धाऊन सोडवण्या
खाटीकाचा वेश तुझा

होता साक्षात्कार आसा
म्हणाली जयजय महेशा
आनंदाने मिटले डोळे
म्हणे उडव मान आता

केदार...
माझ्या 'गमन' ह्या संग्रहातून

  दिवस आता बदलत चाललेयत (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,7818.msg25045.html#msg25045
मोक्ष (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7666.0.html
« Last Edit: July 23, 2012, 11:42:34 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता