Author Topic: मी वाट बघतोय... (गमन)  (Read 1584 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
मी वाट बघतोय... (गमन)
« on: April 02, 2012, 03:21:40 PM »
प्रेमभंगा मुळे वेडा झालेल्या एकाची प्रेमभंग झाल्या पासून ते तो आत्महत्त्या करून मेल्या नंतर पर्यंतची कथा.


तू तोंड फिरवून
निघून गेलीस....
आणि मी बघत राहिलो
तुझी पाठ, आणि तुझं लांब जाणं
मला सोडून...
ह्या प्रेमभंगाच्या आगीत
होरपळायला एकटा...

मग मी बसच्या लाल डब्यात.
अन सिगरेटचे चटके
त्या बुळचट सूर्याला.
कधीतरी..... पडलेला   मी
कुठेतरी, फेकून दिलेला,
गवतावर, बोचणार्या.
किती भगभग....

मग त्या रणरणत्या  आभाळात
ढगांची होडी
मी वल्हवत निघालो
पकडायला चंद्र.
त्यात तोच...तुझा चेहरा...
आग आग डोक्यात.

मग टाकलं चंद्राला
सूर्यावर…
अन वितळला मग तो
अन निघाला पळून
दूर माझ्या पासून
वितळून पाण्या सारखा वहात
खोल खोल दरीतून.

विकट हसलो मी
अन मारली उडी
पकडायला त्याला.
खोल खोल दरीत मी पडत गेलो
अन तो अजून पाळतोच आहे
घाबरून....
लांब माझ्या पासून.

मी अजून वाट बघतोय
त्या चंद्रातल्या तुझ्या चेहर्याची
अन तो चंद्र जाळण्या साठी
त्या गुळचट सूर्याची....

अन म्हणे इथे दरीत मेला
एक प्रेमवेडा
उडी मारून
आत्महत्या करून.
वेडेच सगळे
हा....हा....हा...
म्हणे आत्महत्त्या
इथेच तर आहे मी.
तुझी वाट बघतोय
हवेत विरघळून.
येतेयस ना?

केदार...
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
 
कोंबडी गेली जीवानिशी (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,8408.msg27450.html#msg27450
   


रांग चालली (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7986.0.html

« Last Edit: July 23, 2012, 11:41:12 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता

मी वाट बघतोय... (गमन)
« on: April 02, 2012, 03:21:40 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: मी वाट बघतोय... (गमन)
« Reply #1 on: April 04, 2012, 10:12:07 PM »
tya mulila dusra koni tar milel.....pan mulachya aai-vadil-bahin-bhavala dusra mulga-bhau kasa milnar? :(

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मी वाट बघतोय... (गमन)
« Reply #2 on: April 04, 2012, 11:34:10 PM »
so sad...pan khup yogya ritine dukha sabdat mandalay... :(

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: मी वाट बघतोय... (गमन)
« Reply #3 on: April 07, 2012, 12:32:41 PM »
wow......khup sunder thought  :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):