Author Topic: कोंबडी गेली जीवानिशी (गमन)  (Read 774 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
एका मळ्यात होती
कोंबडी दाणे टिपीत
होती सुरेख काळी
पिल्ले तिच्या सवेचं

कोंबडीस काळजी भारी
पिल्ले तिची हि काळी
नेईल सहज उचलुनी
आकाशी फिरती घारी

ठेऊन नजर पिल्लांशी
चौफेर  कानोसा घेई
पकडून ती किड्यांना
देई पिलांच्या चोची

दिसता कुणी कुरणात
पिल्ले पळती भिऊन
धावत दडती सारी
आईच्या पंखा आड

पिल्लांस आधार भारी
आईच्या पंखा खाली
त्याना भीतीनं कसली
आई असता जवळी

कोंबडीस वाटे मौज
घेऊन पिले पंखात
देऊन धीर म्हणते
"मी इथेच रे बाळानो"

एकदा परी अचानक
झाले भलतेच आक्रीत
येऊन कुणी कुरणात
घेऊन निघे आईस

फोडला टाहो पिल्लांनी
धावली तिच्या मागुनी
परी म्हणे ती पिलांनो
"चला पाळा दूर तुम्ही”

पोरकी पिले बिचारी
रडत घराकडे पळाली
वाटेत जरी घाबरली
आता ना उरली आई

त्या अंत समयी रडून
कोंबडी देवास म्हणाली
सांभाळ तूच पिलांना
त्याना कुणी न वाली

मुकली माय पिलांना
मुकली पिले मायेला
घरकुल तुटले त्यांचे
कोणी न वाली त्यांचा


***********************************


(चाल बदलावी)

त्या संध्याकाळी एका हॉटेलात
चालू होती पार्टी जोरात
बाटल्या बिअरच्या हातात अन
तंगडी कोंबडीची तोंडात

तोडून लचका तंगडीचा
चिडून एक म्हणाला
चव नाही कोंबडीला
मजा नाही पार्टीला

हाय बघा दैवाची खेळी!
व्यर्थ होते इथे मरणही!
कोंबडी जाते जीवानिशी अन
खाणारा म्हणतो वातड होती……


केदार...
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
 
 खरी मुक्ती (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,8458.msg27659.html#msg27659मी वाट बघतोय... (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8055.0.html
« Last Edit: July 23, 2012, 11:40:46 AM by केदार मेहेंदळे »