Author Topic: कोणी तरी असतं तिथ. (गमन)  (Read 1196 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
कोकणातल्या वाडीतील घर कौलारू
रात्रीच्या समयी दिसते गूढ
असेल धुक्यामुळे
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

आरश्यात बघताना अचानक
कोणीतरी मागे आल्याच वाटत
असेल भास
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

दुपारी झोपलेलो असताना
ओटी वरचा झोपाळा कार्कारतो
असेल भास
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

दिवे लागणी झाल्यावर तिन्हीसांजेला
दाराची कडी खळखळते
असतील व्रात्य मुलं
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

रात्री सगळ शांत असताना
अचानक माड सळसळतो
असेल वारा
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

मध्य रात्री कधीतरी
स्वैपाक घरात डबे खडखडतात
असेल उंदीर 
म्हणून दुर्लक्ष करतो आपण
दिसत नाही कोणी
पण कोणी तरी असतं तिथे

माजघरातील फोटो फ्रेम
मध्य रात्री दिसते रिकामी
हार हलताना बघून
घाबरतो आपण
दिसत असत आपल्याला
कोणी तरी असतं तिथ.


केदार ....
  स्पर्धा (गमन)
  http://marathikavita.co.in/index.php/topic,8634.msg28438.html#msg28438तपश्चर्या (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8539.0.html
« Last Edit: July 23, 2012, 11:36:19 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #1 on: May 21, 2012, 01:16:20 PM »
आवडली आपल्याला कविता...मस्त आहे. रोजच्या जीवनातील प्रसंग.... :)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #2 on: May 25, 2012, 11:17:05 PM »
khupach bhari ..ekdam bhari..kay mast ani haluwaar bhiticha abhaas kelay tumhi...kharach kedar bhau tumhi khup chaan lihita .

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #3 on: May 25, 2012, 11:18:28 PM »
aankhi ekhadi ashich kavita plzzz......mala ashya kavita khup awadtat..mi ti kavita mazya wall war post kartoy tumhala vicharun

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #4 on: May 28, 2012, 10:19:05 AM »
dhanyvad balramji ani prashantji......

Nitesh Ghadge

 • Guest
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #5 on: May 29, 2012, 12:38:49 PM »
khup chan

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: कोणी तरी असतं तिथ. (गमन)
« Reply #6 on: June 05, 2012, 10:54:34 AM »
Mast Kavita..........vachtanach khup bhiti vatali  :(