Author Topic: आई (नर्मदाकाठच्या कविता )  (Read 926 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तुझ्या पाण्यावर तरंगणारी
छोट्या छोट्या दिव्यांची रांग
त्या तेजाने उजळलेले तुझे रूप
पाहता पाहता मला
माझी आई आठवली
देवा समोर डोळे मिटलेली
तशीच सात्विक उजळ
माझा जीवनाधार असलेली
अन जाणवले
ती तूच होतीस तिथे
ती तूच आहेस इथे

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:39:52 AM by MK ADMIN »