Author Topic: पाणी (नर्मदाकाठच्या कविता )  (Read 1022 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
पाणी भरत आहे
तट बुजत आहेत
गावोगावचे देखणे
घाट बुडत आहेत
भांडून माणसे
थकली आहेत
रडून माणसे
थकली आहेत
हाती पडले ते
घेवून माणसे
दूरवर जावून
वसली आहेत
गाव पुन्हा
दिसणार नाही
शेत कधी ही
फुलणार नाही
मी खेळलो
ते अंगण शाळा
आता इथे
उरणार नाही
डोळ्यात दाटला
पूर द्वारकेतला
आता कधीच
आटणार नाही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:31:22 AM by MK ADMIN »