Author Topic: माणूस आहोत आपण... (नितीन आगेच्या निमित्ताने)  (Read 936 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550सतरा अठरा वर्षाचे
तरुण कोवळे वय
कुठल्याही मुलीने
हाक मारली तरी
धडधड वाढायचे
नर्व्हसनेस झाकायचे
वेड्या खुळ्या स्वप्नांचे
रानभूली वय
अश्या या वयात
अनोळखी वनात
हलकेच पाऊल
पडले म्हणून
यौवनाच्या गंधाने
नकळत छाती
भरली म्हणून
द्वेषाचे तीर गेला
धुंद हृदयास भेदून
कळल्या वाचून गंध कसला
कुठल्या फुलावरून आला
कट्टर कडव्या हातांनी
श्वास टाकला बंद करून
माणूस आहोत
माणूस आहोत
माणूस आहोत आपण
कितीदा सांगायचे
कुणा कुणा सांगायचे
कानामध्ये ओरडून

विक्रांत प्रभाकर« Last Edit: May 04, 2014, 06:37:18 PM by MK ADMIN »