Author Topic: आर्जव(आइ मला तुझी आठवण का नाही आली)  (Read 1010 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
आई तुझ्या ममतेची गोडी कशी मला कळेना
शब्दाची माझ्यासंग प्रित का जुळेना
हाक तुझी कशी या ह्रदयाला समजना
आई तुझी आठवण मला आज का येईना ?

भरल्या त्या डोळ्यामध्ये
माझ्या जीवनाच पुस्तक रंगल
आई माझ्या दुनियेमध्ये
तुझ सपान् का भंगल?

लालसेच्या अतिमोहापायी
आयुष्यभर कावळ्याची जशी दैना झाली
मनात घर केलेल्या मैनेमुळे
मला तुझी आठवण का नाही आली?

फुलाच्या कळीमध्ये अस काय झाल,
एका अनोळखीच्या येण्याने माझ जीन बर्बाद झाल ,
आई तुझ्यामुळे माझ मनही रुसल
माझ्या आयुष्यात तुझ ऋण का नाही राहील?

आई तुझ्यामुळे जीण झालय कस अंधूक
वाटतय जस कोणी डोई लावली बंदूक,
काम सोडून थोडी काढ तू सवड
आठवण तुझी येण का झालय आई आज अवघड?


Marathi Kavita : मराठी कविता


Sachin Pattewar

  • Guest
उत्तर
देह माझा
प्रयास तुझ्या इच्छापुर्तीचा

डोळे माझे
ध्यास तुझ्या स्वप्नपुर्तीचा

मस्तिष्क माझे
विचार तुझ्या सुखाचा

हात माझे
बळ तुला जीवनभराच

नाक माझे
श्वास तुझ्यासाठी जगण्याचा

मुलांना जन्म दिलास तू
भविष्य साकारायचय मला

कर्तुत्व माझे
मिळणारं श्रेय अन् सन्मान तुला
मेहनत माझी।
मिळणारा मोबदला तुला

राञंदिवस काम
करणं तुझ्यासाठी,
पैशाला पैसा जोडण
केवळ तुझ्यासाठी

माझ्या घराची लक्ष्मी तू
माझ्या जीवनाचा आधार तू
माझ्या संपत्तीची वारसदार तू

सचिन पत्तेवार

krushna pawar

  • Guest
very good