Author Topic: रात्र (एक गूढ काव्य लिहिण्याचा प्रयत्न)  (Read 868 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
मी पडदा बाजूला केला.
रात्र पसरलेली............................. नेहमी सारखी.
आणि..... तोही होता.....
खिडकीच्या बाहेर.....
चेहरा घट्ट चिटकवून.....
बंद काचेला.................................नेहमी सारखा.

''प्लीज मला आत येउदे''
त्यानी विनवलं.............................नेहमी सारखं.
आणि काचेवर खरखर.....
टपोर्या पावसाच्या थेंबाची.....
जणू खरवडतोय नखांनी तो .....
बंद काचेवर.................................नेहमी सारखा.

गळलेली पानं उडत येताहेत.....
खिडकी कडे.................................नेहमी सारखी.
जणू पाठलाग करताहेत त्याचा.
....आणि दूरवर शहराचे दिवे,
प्रखर, लाल..... जणू बघताहेत त्याच्याकडे, 
रागा रागानी ................................नेहमी सारखे.

मी बघितलं त्याच्याकडे,
आणि वळलो...............................नेहमी सारखा. 
आणि पुन्हा थरारली काच
सोसाट्याच्या वार्यामुळे.
जणू तो ठोठावत होता.....
काचेवर जोरात.............................नेहमी सारखा. 
   
''मला भेटू दे.   आता रात्र आहे''
तो ओरडला..................................नेहमी सारखा. 
मुसळधार कोसळता पाउस,
थंडगार झोंबरा वारा,
आणि तो घट्ट चिटकून
काचेला बाहेरून.............................नेहमी सारखा.

मी लाईट विझवले....
खोलीतले माझ्या............................नेहमी सारखे,
आणि मी काच उघडायच्या आत
खिडकी बाहेरच्या त्या आंधारानी,
मिठी मारली... खोलीतल्या अंधाराला
घट्ट घट्ट.........................................नेहमी सारखी.
 

केदार...